Tuesday, September 27, 2005

माझी मराठी भाषेला देणगी...

काल माझ्या रूम पार्टनरला दिवसा अभ्यास करताना पाहून मी तिथल्या तिथे एक नवीन म्हण पाडली ... माझ्या सर्वात मोठ्या समीक्षकाने (मला समीक्षक आहे असा दावा करून मी स्वत:ला लेखकाचे अधिष्ठान प्राप्त करून घेतोय.. ब्लॉग लिहायचा म्हंटल्यावर तेवढं चालतं) "मुकर्रर..." असा प्रतिसाद दिल्याने ती मी इथे मांडतोय ...

"रात्र घालवली चॅटाचॅटी आणि दिवसा बसून पोळ्या लाटी"

पण तेवढ्यात समीक्षक काकांनी दुसरी गोष्टं लक्षात आणून दिली की वेळेअभावी आपण इथे पोळ्या लाटत नाही, टॉर्टीला वगैरे आणून खातो.. समीक्षक ही खरंच वाईट गोष्टं असते. मुक्तछंदाला मारण्याचं काम करतात मेले.. आणि भाषेचा तोटा करतात फ़क्त (त्या हिशेबाने मी याच पानावर क्रिकेटचा खूप तोटा केलाय, ब्लॉग लिहायचा म्हंटल्यावर तेवढं चालतं). तर अशा या समीक्षक काकांची सूचना शिरसावंद्य मानून मी थोडा बदल करतोय..


"रात्र घालवली चॅटाचॅटी आणि दिवसा बसून होमवर्क रेटी"

2 comments:

borntodre@m said...

ekdam fooltoo Marathi :) Vachayala sahi vaTate ... Asach lihit raha ...vachayala amhi ahotach :)

Ek thodasa badal karun mi mazya sarakhya lonkanchi Haalat mandato :)

"Divas ghalavala chaTachaTee aaNi ratri basoon kaam reti!"

AK said...

Ankhi ek mhan .. mazyatarphe ..
Gre kartana marathicha prem uchambalun yeta re..

"Aplach banyan ani aplech pot"

"banyan" chya jagi "sadara" -- tuzya marathi sameekshakansathi,
pan tasa banyan dekhil marathi shabda ahe..