(ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्यातील पात्रांचा खऱ्या आयुष्यातील घटना अथवा पात्रांशी काहीही संबंध नाही. ही कथा पूर्णपणे original असून (लेखक इतरांचे लेखन वाचतच नाही हो) यापूर्वी इतर लेखकांनी लिहीलेल्या एखाद्या कथेशी याचे साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा).
"३४१ तुम्हीच का?" ३४१ हा course number नसून कैदी नंबर आहे अशा अविर्भावात मला विचारत सखाराम गटणे माझ्या हपिसात आला.
"ये बस बाळ, बोल तुला काय doubt आहे?" ब्रह्मदेव असल्याच्या थाटात मी ज्याकिटाची वर केलेली कॉलर तशीच ताठ ठेवत भेदरलेल्या सखारामाला धीर दिला.
"परवा submit करायचाय आणि आज compile होत नाहीये" रडवेला चेहरा करत सखारामाने आपली दिनवाणी कहाणी मला सांगितली.
"काही नाही होत हो, मी आहे ना" g++ compiler मीच लिहिला आहे अशा अविर्भावात मी उत्तर दिले.(आता या कथेमध्ये जर मी एक पात्र म्हणून असलो तर तो मी वर दिलेल्या काल्पनिक पात्रांच्या नोटीशीचा भंग होईल आणि समीक्षक लगेच मला "कारणे दाखवा" म्हणून नोटीस बजावेल, त्यामुळे यापुढे मी माझा उल्लेख ब्रम्हदेव म्हणून करेन, OK?)
जाड भिंगाचा चष्मा, तोंडावरती केविलवाणे भाव, लॉगिन करताना थरथरणारे हात, आणि C++ चे अगाध ज्ञान यावरून आपल्याकडे आलेला विद्यार्थी हा सखाराम असावा हा अंदाज कुठलाही ब्रम्हदेव लगेच बांधेल. त्या थरथरणाऱ्या हातांनीच त्याने लॉगिन केलं - sakharamgatane@appasahebbirnale.edu आणि ब्रम्हदेवाची ट्यूब पेटली. ब्रम्हदेवाने विचार केला, मागच्या semester मध्ये आपण हाच course शिकवत होतो तेंव्हा तपासायला सगळ्यात सोपा असणारा पेपर ज्या मुलाचा असायचा त्याचं नाव सुद्धा असंच काहीसं होतं ना! ४०-४० पेपर तपासता तपासता बिचाऱ्या ब्रम्ह्देवाच्या नाकी नऊ यायचे. पण मग सखारामच काय ती थोडी फ़ार दया दाखवायचा. आपल्या लाडक्या TA ला त्रास होऊ नये म्हणून सख्या काही लिहायचाच नाही. त्यामुळे सख्याच्या पेपरावर मोठा भोपळा काढून ब्रम्हदेवाला लगेच पुढचा पेपर बघता यायचा.
"इथे error येतेय" सख्याच्या त्या south east asian accent मधल्या तोडक्या मोडक्या english मधल्या बोलांनी आदली रात्रं chatting करत जागल्यामुळे बसल्याबसल्या पेंगणारा ब्रम्हदेव जागा झाला.
"कुठे म्हणालास?" ब्रम्हदेवाने झोप झटकत विचारलं.
"हे इथे, class not found म्हणतोय वेडा कुठला." "च्यांव च्यांव SS, प्यांव प्यांव SS, " सख्याच्या शुद्धं उच्चारांनी ब्रम्हदेवाच्या सदाशिव पेठी english ची (खरं तर कृष्णाकाठी english ची म्हणायला हवं, पण कृष्णाकाठी english हे थोडं छत्रपतींच्या राज्यातलं वाटतं, ब्रम्हदेवाचं english हे जास्ती पेशव्यांच्या राज्यातलं असल्यानं ते कृष्णाकाठी पेक्षा सदाशिवपेठी वाटतं, असो.) चांगलीच परीक्षा घेतली.
आता या सख्याला कसं समजावं की याने तो class कुठे शोधायचा ते त्या वेड्याला सांगितलंच नाहीये, तर तो वेडा तरी काय करणार! हे समजवण्यसाठी सख्याला आधी class काय असतो ते समजावं लागेल. खाल्ल्या मिठाला जागून कर्तव्यभावनेने ब्रम्हदेव जीवाचा आटापीटा करू लागला. आजपर्यंत "चेहऱ्यावरची माशी सुद्धा नं हलणे" ही म्हण फ़क्त slip मध्ये शांत उभा राहून captainship करणाऱ्या किंवा match मध्ये सपाटून मार खाल्ल्यावर presentation ceremony मध्ये काहीही उत्तरं देणाऱ्या मोहम्मद अझरुद्दीनलाच लागू पडते असा ब्रम्हदेवाचा भ्रम होता. आपल्या explanation ला निर्विकारपणे प्रतिसाद देणाऱ्या (निर्विकारपणे प्रतिसाद देता येतो का? जाऊदे, लेखकाचे limitation म्हणून सोडून द्या.) सख्याच्या चेहऱ्यावर माशी येऊन बसली नसल्यामुळे सख्या सुद्धा अझरुद्दीनच्याच category मध्ये येतो का ते काही ब्रम्हदेवाला पडताळून बघता आलं नाही. तास दीड तास गेला, ब्रम्हदेवाने सगळे मार्ग वापरून बघितले. आधीच रुंदावत चाललेला ब्रम्हदेवाचा भालप्रदेश या जोरदार लढाईत गळालेल्या २-३ केसांमुळे अजूनच निस्तेज दिसू लागला.
पण ब्रम्हदेव करणार तरी काय! ओरडावं म्हंटलं तर सख्याची सशासारखी भेदरट मूर्ती बघून ब्रम्हदेवाचा राग पाघळून जातो. शेवटी पाटा पिचवर test match चे सलग २ दिवस bowling करायला लागल्यावर bowling team जी युक्ती वापरते ती युक्ती ब्रम्हदेवाला सुचली- वेळकाढूपणा. आपली स्वर्गातल्या duty ची शेवटची १० मिनिटं राहिली आहेत हे लक्षात येताच, सख्याच्या वडिलांचं खरंच आप्पा बळवंत चौकात signboard painting चं दुकान आहे का बघूया म्हणून ब्रम्हदेवाने त्याची इकडची तिकडची चौकशी सुरू केली. पण कुठलं काय! आप्पा बळवंत चौकात तर सोडाच सख्याच्या खानदानातल्या कोणीही पुण्याला सुद्धा भेट दिलेली नाही हे त्यानेच ब्रम्हदेवाला सांगितलं. कसे देतील म्हणा, visa कुठे आहे त्यांच्याकडे! अशा गप्पा मारता मारता सख्या आपले doubtsचे दु:ख विसरून गेला आणि ती १० मिनिटं संपली. आजकाल course number 341 ला call center सारखं 24 X 7 coverage असतं. त्यामुळे ब्रम्हदेवाची duty संपल्यावर लगेच विष्णू आला, आणि सख्याला त्याच्याकडे सुपूर्त करून ब्रम्हदेवाने काढता पाय घेतला.
4 comments:
झकासच रे ! म्हणजे काय, तर TA ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही तर ...
FakkaD jamala aahe ;)
hahahahhaha
awesome ..simply superb
Post a Comment